वैद्यकिय पथकाच्या प्रयत्नातून एका पक्ष्याला मिळाले जीवदान

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा उपजिल्हा रुग्णालय परिसरात दि.१७ मे ला गंभीर जखमी अवस्थेत एक पक्षी आढळला .त्या पक्षाला वरोरा शासकीय रुग्णालयाच्या अधिसेविका वंदना बरडे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला .पण तो पक्षी भुर्र्कन उडाला.नंतर त्याच परिसरात प्रयत्नाची शिकस्त करून त्या पक्ष्याला त्यांनी पकडले . इतकेच नाही तर त्याची दुःखापत बघून वाटतं नव्हतं कि तो जखमी पक्षी वाचेल.पण शेवटी प्रयत्नाअंती त्यास जीवनदान मिळाले.डाॅ. बुटोलिया,व डॉ .जाधव यांनी त्या पक्षाच्या जखमेवर टाके लावलें व ड्रेसिंगही केले . तो पक्षी अधिक गंभीर जखमी झाला होता. डॉ .बूटोलिया , डॉ . जाधव ,वंदना बरडे, सोनल दांडगे,आफरीन खान,समिर किन्नाके , अमोल भोग, बंडू पेटकर या वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नातून त्या पक्षास जीवदान मिळाले .त्यास सिरिंजच्या साह्याने ऑन्टीबायोटिक्स,पेनकिलर औषधी , तापाची औषधी या शिवाय 25%ग्लुकोज देवून वेळीच उपचार करण्यात आला. सर्वांच्या प्रयत्नातून हे काम शक्य झाले.शेवटी पशू पक्षी हे ही एक जिवच आहे. त्यांना वाचविणे व त्यांची काळजी घेणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे.सध्या या पक्ष्यावर पुढील उपचार पशु रुग्णालयात सुरू असल्याचे वंदना बरडे यांनी प्रतिनिधीस सांगितले.