अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे श्री सद्गुरू यशवंतबाबा यांचा अमृतमहोत्सवी (७५वी) पुण्यतिथी सोहळा उत्साहात सुरु..!!

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अकोले : सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक,ता.अकोले येथे श्री सद्गुरू यशवंतबाबा यांचा अमृतमहोत्सवी (७५वी) पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मार्गदर्शक योगी केशवबाबा चौधरी,ह.भ.प.मनोहर बाबा भोर,ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख, ह.भ.प.विठ्ठलपंत महाराज,ह.भ.प.दिपक महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हरी नामाच्या गजरात पार पडत असुन महाराष्ट्र राज्यातील ह.भ.प.सुर्यवंशी महाराज,गायकवाड महाराज,शिंदे महाराज,जोशी महाराज,कैलासगिरी महाराज,घुले महाराज,सदगिर महाराज अशा ख्यातनाम असे कीर्तनकार सेवा देत असुन या आत्मोधारी संधीचा भावीक भक्तांनी लाभ घेऊन बंधुत्वाची भावना वृध्दिंगत करुन शोभा वाढवावी असे आव्हान श्री सद्गुरू यशवंबाबा धार्मिक ट्रस्टचे अध्यक्ष दशरथराव सावंत,उपाध्यक्ष अशोकराव देशमुख,सेक्रेटरी केशवबाबा चौधरी तसेच समस्त विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. शनिवार दि. २५ जुन २०२२ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० वाजता प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे याप्रसंगी मानाचा सद्गुरू यशवंतबाबा वारकरी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असुन यावर्षाचे या पुरस्काराचे मानकरी धर्माचार्य समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना गोऋषी ओम भारतीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार पार पडणार आहे.तद्नंतर समस्त बेलदार समाज महाराष्ट्रराज्य यांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.