नेरी तंमुसच्या पुढाकाराने प्रेमी युगल झाले विवाहबद्ध

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
विवाह हे एक पुरुष व स्त्री अशा दोन व्यक्ती मधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे तर अन्य धर्मीय हा कायदेशीर करार असतो.
चिमूर तालुक्यातील नेरी येथे आज दिनांक 12 जून 2023 ला महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या वतीने एका प्रेमीयुगला चा विवाह ग्रामपंचायतचे आवारात लावून देण्यात आला.
नेरी येथील नवोदित प्रेमवीर सौरभ विठ्ठल कामडी वय 28 वर्ष (जात तेली) व नेरी येथील नवोदित वधू सलोनी सदाशिव जीवतोडे वय अठरा वर्ष (जात माना )यांचे मागील दोन वर्षापासून एकमेकांसोबत प्रेम संबंध निर्माण झाले. दोघेही एकाच वार्डातील असल्यामुळे त्यांच्या प्रेम संबंध निर्माण होऊन त्यांनी लग्न करण्याचे ठरवून “सात जियेंगे साथ मरेंगे “या म्हणीप्रमाणे दोन्ही प्रेमवीरांनी विवाह करण्याचे ठरविले आणि याची माहिती घरच्यांना दिली वराकडील मंडळी तयार झाली परंतु वधू कडील मंडळीचा या विवाहाला विरोध असल्यामुळे त्यांनी नेरी येथील तंटामुक्त समितीकडे विवाह लावून देण्यासाठी अर्ज सादर केला. समितीने अर्जाची रीतसर तपासणी करून उपरोक्त जोडप्याचा हिंदू रितीरिवाजा नुसार लग्न लावून दिले .या विवाहप्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिदास चांदेकर, ग्रामपंचायत नेरीच्या सरपंचा रेखा पिसे, डॉक्टर रमेश राऊत, पत्रकार संजय नागदेवते, पत्रकार पंकज रणदिवे, पत्रकार रामचंद्र कामडी, माणिकजी नगराळे, अभिजीत कामडी, गंगाबाई कामडी, सत्यभामा कामडी, पोलीस पाटील शुद्धधन घोनमोडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.