विभागीय प्रदर्शनी करीता समूह रवाना

प्रतिनिधी: हेमत बोरकर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय प्रदर्शनी करीता तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर येथून 12 स्वयंसहायता समूह रवाना. त्यामध्ये 2 खाद्य समूह व 10 इतर समूह सहभागी होणार आहे. पंचायत समिती चिमूर चे गट विकास अधिकारी श्री. राजेश राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून सदर समूहांना विभागीय प्रदशानी करीता रवाना केलेत.
स्वयंसहाय्यता समूहाकडून उत्पादित होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वस्तूचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन केले या प्रदर्शनी मध्ये नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील स्वयंसहायता समूह सहभागी होणार आहेत विभाग स्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक 18 मार्च 2023 ला सकाळी 10.00 वाजता चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे होणार आहे.
सदर प्रदर्शनी 18 ते 21 मार्च 2023 या दरम्यान होणार आहे तरी या प्रदर्शनीमध्ये नागरिकांनी उपस्थित राहून ग्रामीण भागातील समूहातील महिलांनी उत्पादित वस्तूची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालावी.
यावेळी श्री. राजेश बारसागडे तालुका अभियान व्यवस्थापक, श्री. प्रशांत मडावी तालुका व्यवस्थापक, श्री. मेघदीप ब्राह्मणे तालुका व्यवस्थापक, कु. रजनी खोब्रागडे तालुका व्यवस्थापक, श्री. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, श्री. ईश्वर मेश्राम, कू. दिपाली दोडके, कू.स्वप्न उराडे, कू. सारिका बाहुरे, श्री. पुंडलिक गेडाम पशु व्यवस्थापक, श्री. संगेल, श्री. किरण कुमार मेश्राम, कु. प्रीती डोंगरे, श्री. टोनी मेश्राम उपस्थित होते .