चिमूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेचे रिक्त पदे त्वरित भरा

प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी.

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
मो.8975413493
चिमूर तालुक्यातील काही गावांतील अंगणवाडी सेविकेचे पदे रिक्त आहे,लहान बालकांचे संस्कारक्षम संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी अंगणवाडी ही महत्त्वाची आहे.परतु मागील काही वर्षांपासून चिमूर तालुक्यातील काही गावांमध्ये अंगणवाडी सेविकेचे पदे रिक्त असल्याने त्या गावातील बालकांना अंगणवाडीतील सेवेंपासून वंचित राहावे लागत आहे.तसेच त्या गावातील स्तनदा व गरोदर मातांना सुध्दा सेवा पुरविल्या जात नाही त्या करिता चिमूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेचे रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे सहयोगी प्रहार सेवक मुरलीधर रामटेके ,सत्यपाल गजभे यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून केली अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष चिमूर यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सुध्दा निवेदनातून इशारा देण्यात आला.