ताज्या घडामोडी

अखेर महसूल कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाची यशस्वी सांगता

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

गेल्या १५जूलै पासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेला महसूल कर्मचारी संघटनेच्या बेमुदत आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.एकंदर १३ रास्त मागण्यां पैकी काही मागण्यां पदरात पडल्या तर अन्य मागण्यांबाबत पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाला मुंबई मुक्कामी एका बैठकीत आश्वासन देण्यात आल्याचे वृत्त आहे.महसूल मंत्र्यांनी काही महत्वाच्या मागण्या मान्य
केल्याचे स्थानिक महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी या संपाविषयी मध्यस्थी केली.
बैठकीला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्र्वास काटकर, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वयक राजु धांडे, अध्यक्ष जिवन आहेर, सरचिटणीस किशोर हटकर यांच्यासह अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.तदवतच या वेळी चंद्रपूरचे शैलेश धात्रक व अजय मेकलवार हे देखील मुंबई बैठकीत उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close