ताज्या घडामोडी
राष्ट्र सेवा दल चिमूरतर्फे ऑगस्ट क्रांतीदिनी शहिदांना आदरांजली

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
राष्ट्र सेवा दल चिमूरतर्फे ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हुतात्मा स्मारक,चिमूर येथे क्रांतीलढ्यात शहिद झालेल्या विरांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली.चिमूरला १९४२ मध्ये झालेल्या ऐतिहासिक क्रांतिलढ्यात विरमरण पत्करलेल्या शहिदांना याप्रसंगी आदरांजली वाहण्यात आली.
हुतात्मा स्मारक येथे शहिदांना आदरांजली अर्पण करताना सामाजिक कार्यकर्ते ऍड.भूपेश पाटील,राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे,राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे,चिमूर तालुका कार्याध्यक्ष कैलाश बोरकर,प्रल्हाद बोरकर, निलेश कोसे,बंडू नन्नावरे,संजय सर,विशाल वासाडे,नितीन पाटील,प्रकाश मेश्राम,आशिष वाघमारे,मनोज राऊत आदी उपस्थित होते.