ताज्या घडामोडी
आनंद निकेतन महाविद्यालयाचा खो-खो स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयिन खो-खो स्पर्धा अँड.विठ्ठलराव बनपूरकर कला वाणिज्य महाविद्यालय, मालेगाव येथे दिनांक 4 ते 6 नोव्हेंबर 2022 ला आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये आनंद निकेतन महाविद्यालयाच्या पुरुष संघाने चमकदार कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत आपला विजय प्रस्तापित केला.या विजयी संघातील खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा.सौ.राधा सवाणे,शारीरिक शिक्षण व क्रिडा प्रमुख प्रा.तानाजी बायस्कर,तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंद केले व पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.