महिला मुक्ती मोर्चा चन्द्रपूरच्या वतीने जिल्हा अधिकारींना निवेदन

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
महाराष्ट्रामध्ये महिला व अल्पवयीन मुलीवरील अत्याचार झाल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. या घटना अतिशय दुर्दैवी असून निंदनीय आहेत हे सर्व खटले चालवून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि महिलांना न्याय मिळावा याकरिता महिला मुक्ती मोर्चा चन्द्रपुर च्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय चन्द्रपूर येथे निवेदन सादर करण्यात आले.
मुंबई येथील साकीनाका अत्याचार पिडीत महिलेचा मृत्यूशी झुंज देतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच अमरावती जिल्हयातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या अल्पवयीन व सात महिण्याच्या गर्भवती मुलीला बदनामीच्या भितीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना घडली म्हणुन वरील घटनेतील आरोपींवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे यापुढे राज्यातिल अत्याच्यार त्वरीत थांबले पाहीजे महिलांवरील अत्याचार रोखकन्यासाठी सरकारने यापुढे महिले विषयी गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे .आपल्या मार्फत तशी सुचना देऊन पोलीस प्रशासनाला कडक आदेश देण्यात यावे अशी जिल्हा अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री , मा. राज्यपाल , मा.पालकमंत्री चन्द्रपुर जिल्हा पोलीस अधिक्षक चन्द्रपुर यांना महिला मुक्ती मोर्चा चन्द्रपूर तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी महिला मुक्ती मोर्चा चन्द्रपूर जिल्हा उपाध्यक्ष संघमित्रा रंगारी , चन्द्रपूर जिल्हा महासचिव अजय गोवर्धन ,चन्द्रपूर जिल्हा सहसचिव मारोती आत्राम ,चन्द्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष रोशन दुर्गे ,चन्द्रपूर जिल्हा विधी सल्लागार अॅड. मदन भैसारे ,चन्द्रपूर शहर अध्यक्षा स्वेताताई फंदी ,चन्द्रपूर शहर उपाध्यक्ष कोरेवार ,चन्द्रपूर शहर महासचिव किर्तीताई गुरुनुले ,चन्द्रपूर शहर सहसचिव हनुमान बनकर ,चन्द्रपूर शहर सदस्या झुली डुकआ ,चन्द्रपूर शहर सदस्या वंदना दोडके ,चन्द्रपूर शहर संघटक प्रतिभा मडचावे उपस्थित होते.