कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान.सुरेशरावजी चौधरी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
41 रक्तदात्यांनी केले रक्तदान
ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरीचे सभापती मान. सुरेशरावजी चौधरी यांच्या अमृतहोत्सवी (75) वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर स्थानिक खैरे कुणबी समाज भवन गोंडपिपरी येथे पार पडला.या रक्तदान शिबिराला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मान.सुभाषभाऊ धोटे, गोंडपीपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मान.संदीप धोबे सर,मान.के. डी.मेश्राम तहसीलदार गोंडपिपरी हे उपस्थित होते.रक्तदान शिबिराला गोंडपीपरी तालुक्यातील लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.मान.सुरेशरावजी चौधरी यांना मान.ठाणेदार साहेब गोंडपीपरी,के. डी.मेश्राम तहसीलदार साहेब.आणि राजुरा क्षेत्राचे आमदार मान.सुभाष भाऊ धोटे यांनी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आणि मान.सुरेशराव चौधरी यांच्या कुटुंबात जवळपास 17 व्यक्ती असल्याने त्यांच्या संयुक्त कुटुंब पद्धतीचा गौरव केला.41 रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानाबद्दल मान. सुरेशरावजी चौधरी यांनी आभार मानले.