ताज्या घडामोडी
मुल येथील बाजारपेठेत शुकशुकाट
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
तालुकास्तरावरील मुख्य बाजारपेठ असलेली मुल येथील बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचे कडक निर्बंध लावले असल्याने मुल येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. गडचिरोली चंद्रपूर मार्गावरील मुख्य ठिकाण असल्याने तालुक्यातील साठ ते सत्तर गावातील नागरिक मूल येथे खरेदीसाठी येतात परंतु शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सिनेमागृहे,दुकाने व बाजारपेठा पूर्ण दिवस बंद ठेवली असल्याने मुलमध्ये कडक लाकडावून पाहायला मिळत आहे.