बाबाजानी दुर्रांणी साहेबांचा चारठाणा येथे भव्य सत्कार

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
चारठाणा येथे ओ.बी.सी. नेते नानासाहेब राऊत यांच्या वतीने विकासरत्न आ.बाबाजानी दुर्रांणी साहेबांचा वाढदिवसा निमीत्त भव्य सत्कार समारंभ मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. यावेळी आ.बाबाजानी साहेबांची साखरतुला करण्यात आली व शालेय विद्यार्थ्यांना वही,पेन,पुस्तक वाटप करण्यात आले, या मंगल प्रसंगी जि,प.सदस्या सौ.मिनाताई राऊत यांनी आ.बाबाजानी साहेबांचे औक्षन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेलचे प्रदेश सरचीटणीस श्री.नानासाहेब राऊत यांनी सत्कारमुर्ती आ.बाबाजानी साहेबांचा शाल,श्रीफळ,हार व स्मृती चीन्ह देऊन सत्कार केला. यावेळी स्थानीक पत्रकार संघ व चारठाणा ग्राम पंचायतच्या वतीने सुद्धा आ.बाबाजानी साहेबांचा सत्कार करण्यात आला.
नानासाहेब राऊत यांनी सत्कारमुर्ती आ.बाबाजानी साहेबांच्या प्रती आपले मनोगत व्यक्त करतांना बाबाजानी साहेबांचे अनेक पैलु प्रकट केलेत. परभणी जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता व राजकारणाला समाजकारणाची सांगड घालुन धर्मनिरपेक्ष नेतृत्वाचे आदर्श मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आ.बाबाजानी साहेब असे गौरवद्वग्वार काढले, व बाबाजानी साहेबांची पक्षनिष्ठा पाहुन पक्षश्रेष्ठी भवीष्यात त्यांना मंत्रीपद देऊन त्यांचा योग्य सन्मान करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. जेष्ठ नेते प्रभुअप्पा वाघीकर यांनी ही आ.बाबाजानी साहेबांप्रती आपले मनोगत व्यक्त करुन त्यांना आपल्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप व सत्कारास ऊत्तर देतांना आ.बाबाजानी दुर्रांनी साहेबांनी नानासाहेब राऊत यांना आश् वस्त केले की चारठाणकरांचे प्रेम मी कधीही वीसरणार नाही. चारठाणा गावाला ऐतीहासीक व धार्मीक वारसा लाभलेला आहे, या ऐतीहासीक वारसाचे जतन करण्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करीन व चारठाण्याच्या विकासाच्या बाबतीत नक्कीच मदत करीन. यासोबतच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष या नात्याने कटीबद्ध आहे अशी ग्वाही दिली. व भवीष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे ऊभा आहे असे अधोरेखीत केले.
वाढदिवसा निमीत्त सत्काराच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुण ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे यांची ऊपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणुण मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री.दत्तात्रय मायंदळे, नगरसेवक गोवींद हारकळ, जि.प.सदस्य अविनाश काळे, प्रभुअप्पा वाघीकर, काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष गणेश काजळे, सुधाकर नागरे कृष्णा राऊत, माजी कृषी सभापती भगवानराव राऊत, मुफ्ती कलीम बेग मीर्झा, सिराज मौलाना, फेरोज खान, सिराज भाई, जम्मु भाई, हाशम भाई, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, ऊपसरपंच वाजेद कुरेशी, ग्रा.प.सदस्य स.रहेमत अली, बद्रोदीन काजी, सलाम ईनामदार, नाना निकाळजे, मतीन तांबोळी, मुन्ना तमशेटे, माजी ऊपसरपंच तहेसीन देशमुख, संदिप देशमुख, स.दाऊद अली, बाबासाहेब मेहेत्रे, गुरुप्रसाद तमशेटे, कृष्णा महाराज सोनटक्के, ओमप्रकाश लोखंडे, पत्रकार आबेद देशमुख, ईसाक काजी, शारेख देशमुख, रंगनाथ गडदे, एकनाथ आवचार, प्रभाकर कुर्हे, एकबाल काजी, समीऊद्दीन काजी, नईमोद्दीन काजी, राजु काजी, कासीम ईनामदार, हापेज ईनानदार,आसेफ शेख, सय्यद अर्शद, ईरफान ईनामदार,आसाराम घाटुळ, कीसनप्रसाद खाडे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची ऊपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवानेते अण्णासाहेब राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन शाहिर भारत मुंजे यांनी मानले.