ताज्या घडामोडी
चिमूर आगाराच्या चिमूर डोमा कांम्पा एस. टी. बसचा अपघात

सुदैवाने जीवित हानी टळली.
प्रतिनिधी: सुनिल गेडाम
चिमूर आगारातील चिमूर व्हाया डोमा कानपा जाणारी बस क्रं. MH 40 N 9581 ही बस चिमूरवरून कानपा जाण्यासाठी निघाली असता नवतळ्या पासून काही हाकेच्या अंतरावर बस चालकाला उन्हाच्या दाहकतेमुळे चक्कर आली व चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एस टी बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. अशी वार्ता नवतळा येथील नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी धावपळ करून बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून जवळच्या नेरी येथील आरोग्य केंद्रात किरकोळ मार असणाऱ्या प्रवाशांना भरती करण्यात आले.या अपघातात मात्र बस चालकाला जबर मार असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.पुढील तपास चिमूर पोलीस व चिमूर एस टी बस आगार प्रमुख करीत आहे.