ताज्या घडामोडी
पळसगांव (पि) ग्रामपंचायत ने केले डॉ बाबासाहेबांना आंबेडकर यांना अभिवादन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
पळसगांव (पि) भारतीय संविधानाचे शिल्पकार,विश्वभुषण, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० व्या जयंतीनिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय पळसगांव येथे दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव असल्यामुळे अगदी साध्या पद्धतीने झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमाला सरपंच सरिता गुरनुले,हाफिज शेख,प्रभाकर गजभिये,अंगणवाडी सेविका रामकला पाटील,शिला मोहूर्ले, संघमित्रा खोब्रागडे,प्रियंका भीमटे, सुधीर जुमडे,विकास खोब्रागडे , भक्तदास कोहचडे,कोमुद डाखोरे,गणेश कोहळे ग्राम पंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.