ताज्या घडामोडी

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद आदर्श शाळा झरीने घवघवीत यश संपादन केले.झरी शाळेचे नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दादासाहेब टेंगसे काका(माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद परभणी), श्री चक्रधरराव उगले ( माजी जिल्हा परिषद सदस्य परभणी), श्री सदाशिवराव थोरात ( माजी सभापती पंचायत समिती पाथरी ), श्री दत्तराव होगे केंद्रप्रमुख शाखा पाथरी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पाथरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. मुकेशजी राठोड होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर पानरे यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेचा विविध स्पर्धा परीक्षेमधील प्रगतीचा चढता आलेख मांडला तसेच शाळेची उणीव क्रीडांगण व शालेय क्रीडांगणाची गरज सर्वांसमोर मांडली. शालेय क्रीडांगणासाठी सर्व मान्यवरांना लोकसहभाग देण्याचे आवाहन केले.
या क्रीडांगणासाठी लोकसहभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री .दादासाहेब टेंगसे (काका)यांनी 101000 रू एक लक्ष एक हजार रुपये देणगी जाहीर केली. तसेच श्री.चक्रधरराव उगले यांनी 21000 रू व श्री. सदाशिवराव थोरात यांनी 11000 रू, श्री.मुकेश राठोड साहेब यांनी 5000 रू, श्री दत्तराव होगे यांनी 2100 रू देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
पाथरी तालुक्यातील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद आदर्श झरी शाळेने सन 2021 22 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक या संपादन केले या शाळेचे पाचवी व आठवी 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.त्यामध्ये विठ्ठल कदम ,ईश्वरी सत्वधर, अनुराधा सवणे, मोहिनी खेत्रे ,संदीप सत्वधर, युवराज सत्वधर ,अनुष्का सत्वधर ,नंदिनी सत्वधर या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक श्री. विठ्ठल पाते श्री.सतीश भुते , श्री.भास्कर रेंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर पानेरे सर, शालेय समिती अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सत्वधर, उपाध्यक्ष श्री सुनील सत्त्वधर, शालेय समिती पदाधिकारी, गावच्या सरपंच सौ.नंदाताई शंकरराव सत्वधर, संजय सत्वधर, दिनकरराव सत्वधर, लक्ष्मण सत्वधर, एकनाथ सत्वधर,तसेच सर्व शिक्षकवृंद श्री.दुगाणेसर, श्री. टोपेसर,श्री. कांबळे सर,सौ. हांगरगे मॅडम, सौ. साबळे मॅडम, सौ. काळे मॅडम इत्यादींनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भास्कर रेंगे तर आभार प्रदर्शन श्री प्रशांत टोपे सरांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close