ताज्या घडामोडी

राजश्री शाहु महाराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशाचा नेता म्हणून जाहीर करणारे पहिले महामानव आहेत -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
मो.8975413493

भारत देशाचे भाग्य विधाते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूर च्या माणगाव येथील परिषदेमंध्ये बाबासाहेबांच्या नेतृत्वाला जाहीर करताना उपस्थित जनतेला म्हंटले होते तुम्ही आमचा खरा पुढारी शोधून काढला याबद्द्ल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉ. आंबेडकर हे या देशाचा उद्धार करतील बाबासाहेबाणा उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आणि बाबासाहेबानी सुद्धा त्यांचा शब्द न शब्द खरा करून दाखवला बाबासाहेब म्हणत की राजश्री शाहु महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत म्हणून राजश्री शाहू महाराज हे पहिले महामानव आहेत ज्यांनी या देशाचे कोहिनूर हिरा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले त्यांचा विद्वत्ताचा सन्मान केला असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी चिमूर येथील पंचायत समिती येथे बार्टी व पंचायत समिती चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाणे राजश्री शाहू महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रेरणादायी कृतज्ञतापर्व म्हणून 100 सेकंद मौन धारण करून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती चिमूर चे कृषी अधिकारी भाऊसाहेब राठोड हे होते तर प्रमुख उपस्थित व मार्गदर्शक बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे डी एम गुंतीवार ग्रामविस्तार अधिकारी अशोक श्यामकुळे ग्रामविस्तार अधिकारी आरोग्य विस्तारअधिकारी सुनीता वडसकर आरोग्यविस्तार अधिकारी रवींद्र सोरदे सहाय्यक लेखाधिकारी अजय डोर्लीकर हे होते पुढे बोलताना बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की मोफत सक्तीच्या शिक्षनाचा कायदा अशो की महिलाना त्यांच्या सामाजिक आणि मानसिक गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य महाराजांनी शभंर वर्षापूर्वी हाती घेतले होते लोकांच्या मनातील लोकराजा सामाजिक न्यायाचे प्रतीक आरक्षनाचे जनक सत्यशोधक समाजाचे आधारवड होते स्त्री उधाराचे उदगाते कृषी व्यापार उद्योग विषयक त्यांचे धोरण हे आजही महत्वाचे आहे आंतरजातीय विवाह बहुजनाचा शैक्षणिक विकास समाज घडवणारे या दुनियेतील पीडित्यांच्या दुःखाने व्याकुळ होणारे सामाजिक करुणेचा महासागर होते हा समाज माझा ही मानशे माझी यांची सुख दुःखे माझीच आहेत असे सतत जाणविल्या शिवाय कृती होत नाही राजदंड ही शोभेची वस्तू नसुन ते सेवेचे साधन आहे याची जाणीव असलेला एकमेव राजा होते म्हणून त्यांचे कार्य हे सर्वासाठी प्रेरणादायी आहे म्हणून महापुरुष यांचे विचार जनसामान्यांना कळावे व त्यांच्या विचारानुसार आपले ध्येय धोरण असावे त्यांच्या समतेच्या विचारांचे आपण सर्वजण पाईक होण्यासाठी त्यानि केलेल्या कार्यप्रति कृतज्ञताव्यक्त करणे यासाठी जयंती पुण्यतिथी ही महत्वाचे असतात असे समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या उपस्थित मान्यवराणी सुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती चिमूर संजय चांदेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन समतादूत स्वप्नील वंजारी यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close