ताज्या घडामोडी

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या

सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश काटे यांची मागणी

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

रासायनिक खतांच्या दरवाढी मुळे शेतकऱ्यांना पिकांचे पोषण अवघड झाले असून उत्पादन खर्च पेलणे अशक्य होऊन बसले आहे .
मागील वर्षा च्या तुलनेत यंदा रासायनिक खताच्या किमतीत 50 टक्के वाढ झाली असून सदर दरवाढ तात्काळ मागे घ्या अशी मागणी निलेश काटे सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस यांनी केली आहे.
शेती पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही औषधे व रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहे परिणामी उत्पादन खर्च दिडपटीने वाढला असून अशा बिकट परिस्थितीला परिसरातील शेतकरी तोंड देत आहे.
केंद्रसरकार च्या शेतकरी विरोधी धोरणामुळे रासायनिक खतांचे भाव 50 टक्के ने वाढले आहे.
शेतीविषयक औषधे व रासायनिक खतांचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च ची जुळवाजुळव कशी करावी या विवंचनेत बळीराजा अडकला आहे.
पूर्वी एक बॅगे मागे 50 ते 100 रुपये भाव वाढ होयची मात्र यंदा अवाजवी दरवाढ झाली आहे.
पूर्वी चे DAP खत 1200 रुपये होते आता ते 1900 रुपये झाले
123216 खत 1175 ला होते ते आता 1875 रुपये झाले
1175 ला मिळणारे 102626 आता 1775 रुपयाला झाले तर 400 रुपयाला मिळणारे सुपरफास्ट आता 500 रुपयाला आहे .
शेतकऱ्यांने पावसाळ्यापूर्वी च्या कामांना सुरुवात केली आहे लोकडाऊन मुळे बँका बंद असल्याने खरीपाच्या पिकांचे नियोजन करीत असताना पिकांच्या पेरणी व निगा राखणे साठी औषधे व खतासाठी आवश्यक पैशाची जुळवाजुळव करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा राहिला आहे.
एकीकडे रब्बी हंगामात पिके बहरली असताना वादळी वारा व गारपिटीने पिकांचे नुकसान झाले अपेक्षा प्रमाणे उत्पादन झाले नसल्याने शेतकऱ्यां समोर खरीप हंगाम काढायचा कसा हा पेच निर्माण झाला असताना रासायनिक खतांची भाव वाढ झालेणे बळीराजा चे आर्थिक नियोजन बिघडले आहे. त्यामुळे सदर दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणा विरुद्ध युवक काँग्रेस
आंदोलन उभारेल असा इशाराही दिला आहे .
याबाबत केंद्रीय खते व रासायनिक मंत्री याना पत्र देऊन रासायनिक खतांच्या किमती त्वरीत कमी करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे निलेश काटे यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close