ताज्या घडामोडी

मालेवाडा येथे वाघाने केले एकास जखमी

वाघ बघण्यासाठी केली होती गर्दी

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

चिमूर येथून जवळ असलेला मालेवाडा येथिल वाघाला बघण्या साठी गेलेल्या शेतकरी मोरेश्वर चौधरी 35 वर्ष यांचे वर वाघाने हल्ला चढवला जिवाच्या आतंकाने पळत सुटलेल्या मोरेश्वर चौधरी यांचे वर वाघाने हल्ला चढवला मोरेश्वर यांनी आरडा ओरड केल्याने काही लोक शेतात काम करणारे मजूर वाघाला पळवून लावले वाघाने जखमी करताच वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या मोरेश्वर चौधरी खांदयाला व पायाला जखमा झाल्या असून प्राथमिक उपचार उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे करण्यात आले व नंतर जखमीला चंद्रपूर येथे हलवण्यात आले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close