ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्यात महिला ठार

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव

सिंदेवाही तालुक्यातील कोकेवाडा पेंढरी येथील महिला वाघाच्या हल्याल ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली
सिताबाई गुलाब चौखे वय ५५ राहाणार कोकेवाडा पेंढरी ही महीला तेंदुपत्ता सकंलनाकरीता पेंढरी येथील दिवान तलाव परिसरात गेली असता त्या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने या महीलेवर हल्ला केला त्यात सिताबाई ठार झाली .घटनेची माहीती वनपरिक्षेत्राच्या अधिकारी यांना मिळताच ते टिम सह घटनास्थळावर दाखल झाले घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेमुळे तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जाणाऱ्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close