भरधाव ट्रॅक्टर ची वस्तीतील विजखाम्बला जोरदार धडक

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
नेरी: येथील नेताजी वॉर्ड न. ५ येथील बुरड मोहला येथे
रात्री उशिरा जवळपास २ ते ३ वाजताच्या दरम्यान भरधाव अज्ञात ट्रॅक्टर ने भरवस्तीत असलेल्या इलेक्टरीक पोल ला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की खांब तारांसहित पूर्ण वाकून गेले. आणि काही कळायच्या आतच पुन्हा ते ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळून गेले. त्यातच ट्रॅक्टर चे हुक घटनास्थळी पडले. सकाळी श्री संजय वैरागडे ह्यांनी सदर घटनेची माहिती वीज वितरण कार्यालयाला कळवली. तिथून श्री चौधरी इलेक्टरीसीयन आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी आले व पाहणी करून माहिती अधिकाऱ्यांना कळवली. व पुढील कार्यवाही कशी करावी ह्याबद्दल विचारपूस केली.
सदर घटना ही रेतीचे अवैध मार्गाने वाहतूक करणारे ट्रॅक्टर मुळे झाली आहे अशी कुजबुज होती. ह्यामुळे अजूनही प्रशासनाचा अशा गैरव्यापारास पाठबळ सुरूच आहे अशी शंका वर्तविली जात आहे.
वाकलेल्या खांब मुळे रहदारीस धोका व वीजपुरवठा खंडित झालेला आहे. लहान मुलांच्या आवागमनास तर फारच धोका आहे. अशात वीज वितरण अधिकारी सेवा पूर्ववत कधी सुरू करतील, अज्ञात ट्रॅक्टर चा शोध कोणती सरकारी संस्था करेल व त्यावर काय कारवाही करेल ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.