ताज्या घडामोडी

परभणी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

केंद्रातील मोदी सरकार ,मागील सात वर्षांमध्ये सत्तेत असताना, पूर्णपणे अपयशी ठरले असून, कोरोणासारखी महामारी रोखण्यात कमी पडले असल्याचा आरोप करत, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने परभणी शहर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आज रविवार 30 में रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये, काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. मागील सात वर्षापासून, मोदी सरकारने नोटबंदी ,जीएसटी सारखे निर्णय घेत देशाची अर्थव्यवस्थेची वाट लावली असून, देश आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या, रेल्वे, बँका, विमानतळ आणि पेट्रोलियम कार्पोरेशन, सरकारने विक्रीला काढले असून, यामुळे येणाऱ्या काळात देश आर्थिक संकटात सापडणार असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.
यावेळी परभणी जिल्हा शहर अध्यक्ष नदीम इनामदार , रवी सोनकांबळे , बालासाहेब देशमुख , बाळासाहेब फुलारी नागेश सोनपसारे , श्रीधर देशमुख , सुरेश देसाई , तुकाराम साठे , अभय देशमुख , अकबर जागीरदार , सरचिटणीस जिल्हा युवक काँग्रेस अब्दुल सईद अहमद सलीम तांबोळी , मतीन शेख , खदीर लाला हाश्मी , सुहास पंडित ,पवन निकम, संजय लहाने, सत्तार पटेल , दिगंबर भोसले , आर एस देशमुख , शजी अहमद खान , दिगंबर खरवडे , नागसेन भेरजे आदी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close