ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते प्रलय म्हशाखेत्री यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

प्रलय हा दुसरा अमोल मिटकरी-मा.राज्यमंत्री. प्राजक्तदादा तनपुरे

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

बहुजनतील कुशल नेतृत्व, शेतकरी , कामगार बेरोजगार व सर्व समान्य जनतेबद्दल व ओबीसी समाजासाठी प्रथम महाराष्ट्रात आरक्षण लागु करण्यासाठी प्रयत्न करणारे व बहुजन समाजाची जाणीव असणारे , देशात महाराष्ट्राची अस्मिता निर्माण करणारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय पवार साहेब यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा , आदिवासी कल्याण , उच्च व तंत्र शिक्षण , नगर विकास , आपत्ति व्यवस्थापन राज्यमंत्री मा .ना . प्राजक्तदादा तनपुरे महाराष्ट्रराज्य यांचे हस्ते व राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष , बेबीताई उईके महिला जिल्हाध्यक्ष , बंडूभाऊ डाखरे जिल्हाकार्याध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपुर व विलासभाऊ नेरकर वरोरा विधानसभा क्षेत्र यांचे मार्गदर्शनात राजुभाऊ कक्कड़ शहर अध्यक्ष , नितिनभाऊ भटारकर जिलाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस यांचे नेतृत्वात व दीपक जैस्वाल , प्रदिप रत्नपारखी , ज्योतीताई रंगारी ,प्रज्ञा पाटील .यांचे उपस्तितित बालाजी सभागृह चंद्रपूर इथे पार पडला.
प्रलय हा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचा माजी जिल्हा कार्याध्यक्ष असून त्याची वक्तृत्व या क्षेत्रात फार मोठी पकड आहे,प्रलयने आज अनेक राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय,जिल्हास्तरीय, वक्तृत्व वादविवाद स्पर्धा गाजवल्या आहे.एवढंच न्हवे तर त्याने निबंध स्पर्धेत सुद्धा आपली एक वेगळी छाप सोडली आहे, त्याने या वर्षी झालेल्या महाज्योति तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्राविण्य पटकावले,आणि या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी त्याचा मा.पालकमंत्री विजयजी वडेट्टीवार यांच्या तर्फे सत्कार सुद्धा करण्यात आला होता,यावरून लक्षात येते की प्रलयची कला क्षेत्रात फार मोठी पकड आहे.
विद्यार्थी परिषदेत काम करीत असल्याचे प्रलयने आज पर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू समोर मांडल्या आहेत व त्यावर सोडवणूक सुद्धा केली आहे.
प्रलयने प्रवेश केल्यावर एका वेगळ्या वक्तृत्व शैलीत मनोगत व्यक्त केले,व त्यांचं मनोगत झाल्यावर मा.राज्यमंत्री साहेबांनी प्रलयला दुसरा अमोल मिटकरी अशी उपमा दिली.
या प्रवेशामुळे चंद्रपुर जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी फार मदत होणार आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close