चिंधीमाल येथे वाघाचे पीळीव प्राण्यांवर हल्ले
तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड वनविभाग अंतर्गत चिंधीमाल येथे जंगलातील वाघ गावातील पीळीव प्राण्यांवर हल्ले करून धुमाकूळ घातला आहे. चिंधीमाल येथे मागील महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेळ्यावर सतत हल्ला करून ठार करणे सुरू असताना या हप्त्यात कोटेवार याचा वगार ठार केला व दुसऱ्या दिवशी हरिदास वरठे यांच्या म्हैस जखमी केला आणि काल तुळशीदास हटवादे याच्या गोर्यावर हल्ला करून ठार
केला, तर विलास सुतार यांची खरेदी करून आणलेली पाळीव उच्च जातवान कुत्री याच वाघाने हल्ला करून ठार केले, रानटी डुकरांची वाढलेल्या संखेमुळे रानटी डुकरे शेतशिवारात येतात तेव्हा वाघ पण आपल्या अन्नाच्या शोधात डुकरांची पाठलाग करून शेतशिवारात येते, तेव्हा वाघ गावालगत असलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून ठार करतोय, यात शेतकर्यांची नुकसान होते आहे, वाघांच्या वाढलेल्या संखेमुळे वाघ बीबट गावात प्रवेश करून हौदोश घालीत आहेत, पाळीव जनावरांसोबत लहान मुलांच्या जिवाला सुद्धा धोका नाकारता येत नाही.