ताज्या घडामोडी

जॉन एम. निकेल यांची चंद्रपूर भेट

अम्मा का टिफीन उपक्रमाचे केले त्यांनी कौतुक.

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

अम्मा का टिफिन हा उपक्रम आता राज्यभर चर्चेला जात असतांना आज युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार प्रमुख जॉन एम .निकेल यांनी आज चंद्रपूर भेट देत त्यांनी शहरात सुरू असलेल्या अम्मा का टिफिन उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले . यावेळी गंगुबाई ऊर्फ अम्मा, आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष गौर, कल्याणी किशोर जोरगेवार, श्री महाकाली माता महोत्सव समितीचे कोष्याध्यक्ष पवन सराफ, अधिवक्ता दीपक चटप आदिंची उपस्थिती होती.
अम्मा यांच्या सुचनेनंतर आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरात अम्मा का टिफिन हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून या उपक्रमाअंतर्गत शहरातील गरिब गरजूंना दररोज घरपोच जेवणाचा टिफिन पोहचविला जात आहे. आता या उपक्रमाची राज्यभर चर्चा असुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकतीच या उपक्रमाला भेट देत कौतुक केले होते . या अगोदर अनेक मोठ्या नेत्यांनी व विविध सामाजिक संघटनांनी या उपक्रमाला भेट दिली आहे. अम्माने सुरु केलेल्या या उपक्रमा बदल अनेक संस्थाच्या वतीने अम्माला पुरस्कृत करण्यात आले आहे.हे विशेष!
दरम्यान आज युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार जॉन एम. निकेल यांनी आमदार जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत सदरहु उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी अम्माचे कार्य प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. भारत हा सेवेकरी देश आहे. या देशाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. चंद्रपूर हे सुंदर शहर आहे. येथे येण्याचा योग आला आणि या सेवेच्या उपक्रमाला भेट देता आल्याचा आनंद असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. अम्माच्या टिफिन उपक्रमाबाबत संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी जाणून घेतली. उपक्रम राबविणे सहज आहे. मात्र आपण त्यात सातत्य ठेवले हे कौतुकास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी अम्मा का टिफिन उपक्रमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close