ताज्या घडामोडी

धान उत्पादक शेतक-यांना १००० रुपये बोनस मंजूर करावे

भाजपा भंडारा तालुक्याची मागणी

धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा अन्यथा भाजपाचे आंदोलन

प्रतिनिधी:नरेन्द्र मेश्राम लाखनी

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी फार भीषण आर्थिक संकटात सापडलेला आहे. मुख्य उत्पानाचे साधन धान (तांदूळ) आहे. धान घरी येवून १ ते २ महिन्यांचा काळ लोटला परंतु परंतु धान खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांचे कि व्यापाऱ्यांचे असा संतप्त सवाल भाजपने केला. या सर्व प्रकरणावरून महाआघाडीचे महाराष्ट्रातील राज्य सरकार अजूनही निद्रावस्थेतच असल्याचे दिसून येते. मागील आठवडयापासून अवकाळी पाऊस सातत्याने येत आहे. त्यामुळे शेतात असलेले धान ओले होवून खराब झाले.

याकरिता जिल्हा प्रशाशनाने शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करावे. धान उत्पादनासाठी येणार उत्पादन खर्च मागील पाच वर्षात तिनपट वाढला. एकीकडे खर्च वाढला परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा भाव मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र बघावयास मिळते. शेतकऱ्यांना क्किंटल च्या मागे ७०० एवजी १००० रुपये बोनस जाहीर करावे. उत्पादन खर्च जास्त झाल्यामुळे धानाला हमी भाव २५०० रू देण्यात यावा. ग्रामिण भागात वयोवृध्द व निराधार लोक मोठ्याप्रमाणात राहत असल्यामुळे त्यांना मिळणारे मानधन मागील ६ महिन्यापासून मिळालेले नाहीत. ते त्यांना देण्याची तात्काळ व्यवस्था करावी. अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन भंडारा तालुका ग्रामीण भाजपाच्या वतीने मा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना मा. तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मार्फत पाठविण्यात आले. वरिल मागण्या मान्य न झाल्यास भाजपा तिव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपा भंडारा तालुका ग्रामीणचे अध्यक्ष विनोद बांते यांनी दिला. या प्रसंगी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष विनोद बांते, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, नितीन कडव, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, अरविंद भालाधरे, तालुका महामंत्री विष्णुदास हटवार, रवींद्र वंजारी, उमेश मोहतुरे, राजेश वाघमारे, आशिष हटवार, गोपाल रेहपाडे, गौरीशंकर जगनाडे, भीमराव काहलकर, बबलू आतिलकर, रवी आगाशे, नरेश बोन्द्रे, पतिराम गिऱ्हेपुंजे, नीलकंठ कायते, वर्षाताई साकुरे, संजय गाढवे, गोवर्धन साकुरे, युवराज रामटेके, गणेश तुमसरे, योगेश्वर ईश्वरकर, भुवनेश्वर जांभुळकर, रणजीत कोटांगले, करमचंद वैरागडे, विलास लिचडे, दीपक लांजेवार, बाबा पठाण, उदाराम लांबट आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close