ताज्या घडामोडी

जिल्हा मध्यवर्ती शाखा बाभळगाव च्या कारभारावर शेतकरी व गावकरी नाराज

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

बाभळगाव जिल्हा मध्यवर्ती शाखेत रोख रक्कम उपलब्ध नसल्याने पीक विम्याची रक्कम खात्यावरून उचलण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे .


जिल्हा मध्यवर्ती बँक बाभळगाव शाखेच्या वतीने दरवाजासमोर फलक लावण्यात आला आहे.
शाखेत रोख रक्कम उपलब्ध नसल्याने आरटीजीएस फॉर्मची विनंती केली जात आहे.
काहींच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित लोकांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची चर्चा आहे. ज्या लोकांनी विमा भरला होता त्यांच्या खात्यात कंपनीकडून विम्याची रक्कम जमा केली जात आहे.
विम्याची रक्कम खात्यात जमा होताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
त्यामुळे हा आनंद तात्पुरता झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाभळगाव शाखेत रोकड उपलब्ध नसल्याने आरटीजीएस मागविण्यात येत आहे. दिवाळीच्या काळात पैशाअभावी पैसे काढून सण साजरा करणाऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच ठेवीदारांची अडचण होत आहे.
खात्यात पैसे असले तरी RTGS करावा लागतो. दिवाळीच्या सणात बाभळगाव बँकेच्या शाखा कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता.
शाखाधिकारी मगर यांनी खातेदारांना शाखेत येऊन आरटीजीएस करून घेण्यास सांगितले आहे. शाखा खातेदारांनी आरटीजीएस फॉर्म दिले आहेत. तो शाखेने स्वीकारला असून आरटीजीएस करण्यात येणार आहे.
RTGS रक्कम खात्यात कधी जमा होईल? एकीकडे दिवाळी साजरी करण्याचा उत्साह दिसून येत आहे. मात्र, 15 नोव्हेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक बाभळगाव शाखेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close