दोन वर्ष तडीपार असलेल्या सराईत आरोपीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली अटक
प्रतिनिधीः प्रमोद राऊत कराड
दोन वर्ष तडीपार असलेल्या सराईत आरोपीला करार शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यापूर्वी कराड शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या पालकर वाड्यातील साहिल मुजावर यास सातारा सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही तो शहरात वास्तव्यात असल्याची गोपनीय माहिती मिळताच कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून त्यास जेरबंद करण्यात आले आहे.कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत हद्दपार गुन्हेगार साहील आलम मुजावर रा. पालकरवाडा मंगळवार पेठ, कराड व त्याच्या साथिदारास पोलीस अधीक्षक यांनी 11 जानेवारी 2024 रोजी पासून दोन वर्षासाठी सातारा तसेच सांगली जिल्हयातील काही तालुक्यातुन हद्दपार केले होते. मात्र तरी देखील हा सराईत हद्दपार गुन्हेगार साहील आलम मुजावर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाचे उल्लंघन करुन पालकरवाडा मंगळवार पेठ येथे छुप्या स्वरुपात वावरत होता.
दरम्यान ही माहिती गोपनीय बातमीदाराकडून कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के. एन. पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील यांना माहिती दिली. पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय देवकुळे, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव यांनी तात्काळ पालकर वाड्यात दाखल होत हद्दपार आरोपी साहिल मुजावर यास ताब्यात घेत त्याचेवर हद्दपार आदेशाचे उलंघन केलेबाबत गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी केली.