ताज्या घडामोडी

सहजं सुचलं हे महाराष्ट्रातील युवतींच हक्काचं व्यासपीठ – सुविद्या बांबाेडे


प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातंच नव्हे तरं अख्ख्या महाराष्ट्रात अल्पकालावधीत सहजं सुचलं व्यासपीठ समाजातील महिलां व तरुणींचे हक्काचे व्यासपीठ बनुन ते लोकप्रिय ठरले अशी भावनिक प्रतिक्रिया सुविद्या बांबाेडे यांनी व्यक्त केली . बल्हारपूर नगरीत आयोजित केलेल्या कार्यशाळेला त्या उपस्थित झाल्या हाेत्या .त्या वेळी या प्रतिनिधीजवळ बाेलतांना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली . गेल्या पाच वर्षा पासून हे व्यासपीठ सातत्याने कार्यरत असून नेहमीच महिला व नवाेदित तरुणींच्या कलागुणांना प्रोत्साहित व प्रेरणा देण्यांचे काम सहजं सुचलंने केले आहे . भविष्यात या व्यासपीठावरील उत्कृष्ट कामगिरी करणां-या महिलां व तरुणींचा विशेष सन्मान करण्यांचा मानस देखिल सहज सुचलंच्या मुख्य संयाेजिका सुविद्या बांबाेडे यांनी या वेळी बाेलून दाखविला .

वर्धा जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील वरुड येथील मुळ रहिवाशी, नवाेदिका लेखिका तथा इंजीनियर रितू संजय लाेहकरे नावाच्या एका बावीस वर्षिय तरुणींच्या संकल्पनेतुन हे महिला व्यासपीठ आरंभ झाल्याचे ते या वेळी सांगण्यांस विसरल्या नाही .विशेषता सुरुवातीला या व्यासपीठा वरील सदस्यांची संख्या बाेटावर माेजण्या एव्हढी हाेती .आज तीच सदस्या संख्या शेकडाेंच्या घरात पाेहचली आहे .या व्यासपीठा वरील दरवर्षि नव्याने संयाेजिका व सहसंयाेजिकांची निवड केल्या जाते हे येथे उल्लेखनीय आहे! विशेषता माझ्या सहवासातील वैदर्भिय प्रख्यात जेष्ठ लेखिका अँड. मेघा धाेटे व नागपूच्या याेगगुरु शिक्षिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे यांची भूमिका सहजं सुचलं साठी फार महत्व पूर्ण राहिली आहे .विद्यमान संयाेजिका व सहसंयाेजिका सराेज हिवरे (राजूरा ) प्रतिभा चट्टे (चंद्रपूर तुकुम ) मंथना नन्नावरे चंद्रपूर , रसिका ढाेणे (वराेरा ) नंदिनी लाहाेळे (राजूरा ) श्रुति कांबळे (चंद्रपूर )यांचे सह इत्तरांचे योगदान माेलाचे राहिले आहे .कला क्षेत्रात साैंदर्य स्पर्धा विजेता कु.कल्याणी सराेदे(कन्हान कांद्री , नागपूर ) उज्वला यामावर (गडचिराेली) मनिषा मडावी (गडचिराेली ) शितल मेश्राम( गडचिराेली ) प्रतीक्षा मैदपवार (वर्धा ) क्रीड़ा क्षेत्रात कु.सायली टाेपकर तरं साहित्य क्षेत्रात जागतिक सुपरिचीत कवयित्रि कु.अर्चना सुतार (पाचवड) तथा प्रतिमा नंदेश्वर (मूल )यांचे कार्य अभिनंदनिय व काैतुकास्पद ठरले असून चंद्रपूरच्या सहजं सुचलंच्या निवेदिका सिमा पाटील यांचे ही याेगदान तेव्हढेच महत्वाचे आहे . शैक्षणिक क्षेत्रा साेबतच आपल्यास कला क्षेत्रातही अमाप आवड असल्याच्या सुविद्या बांबाेडे मुलाखतीच्या शेवटी म्हणाल्या .दरम्यान नागपूरच्या जेष्ठ लेखिका गिता बाेरडकर , स्मिता मेहेत्रे , चंद्रपूरच्या चंदा वैरागडे , वंदना हातगांवकर , सुवर्णा कुळमेथे हैद्राबादच्या विजया तत्वादी , मूलच्या कवयित्रि स्मिता बांडगे , पथ्राेडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे , डाँ .अंजली साळवे , डाँ .भारती नेरलवार , नयना झाडे (नागपुर )चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर , छबूताई वैरागडे , अल्काताई माेटघरे , शुभांगी डाेंगरवार ,राजू-याच्या संजिवनी धांडे , मुंबईच्या रजनी रणदिवे , श्रूति उरनकर, अल्का सदावर्ते , भाग्यश्री सानप यांचे सहकार्य सहज सुचलंला नेहमीच लाभले असल्याचे त्या म्हणाल्या .सहजं सुचलं नवीन वर्षात काही उपक्रम सुरु करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close