ताज्या घडामोडी

१२व्या पुण्यतिथी निमित्त मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्थेतर्फे विकलांग जागरूकता कार्यक्रम संपन्न

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

दिनांक २/२/२०२२ रोजी मातोश्री शकुंतला म. जनबंधु यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त ” विकलांग जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
उपस्थित मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्थेचे संचालक / संस्थापक सुनिल जनबंधु , अध्यक्ष श्री अनिल शेंदरे तसेच पाहुण्यांमध्ये डॉ. उईके सर, फिजिओथेरेपीस्ट डॉ. रिचा मॅडम, सुजाता लांडगे, तसेच क्रिष्णा परिवारातील सारिका कुडवे उपस्थित होते.
संस्थेचे संचालक संस्थापक सुनिल जनबंधु हे विशेष शिक्षक आहेत त्यामुळे त्यांनी आईच्या १२ व्या पुण्यतिथी निमीत्य
डॉ. उईके सर यांनी या विशेष मुलांबद्दलचा जे आताही पालकांना अंधश्रद्धा बाळगतात ते दूर करणे गरजेचे आहे. असे त्यांनी भाषणात सांगितले. डॉ. रिचा मॅडम हे आकुपेशनल फिजिओथेरपिस्ट आहेत. त्यांनी पालकांना सर्वप्रथम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलांना ट्रिटमेंट करणे गरजेचे आहे व सांगितलेल्या सल्ल्यानुसार व विशेष शिक्षकांच्या सल्ल्यानुसार अनुसरून करणे असे त्यांनी सांगितले. तसेच विशेष मुलांचे पालक सो. सुजाता लांडगे तसेच सौ. ज्योती चकोले यांनी सुद्धा मुलांबद्दलची माहिती दिली.
विकलांग जागरूकता कार्यक्रम असल्यामुळे संस्थेतर्फे विशेष मुलांना भेटवस्तू देण्यात आला. तसेच इतर सहभागी असलेले झोपडपट्टीतील लोकांना कपडे दान करण्यात आले व भोजनदान करण्यात आला. सोबत श्री. दोमोधर चकोले यांनी कार्यक्रमात व नागपूर धम्मानगर झोपडपट्टीतील सर्वांनी चांगल्या प्रकारे सहभाग दिला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close