रामनामाच्या जयजयकाराने दुमदुमली आलापल्ली नगरी

आलापल्ली ला निघाली भव्य शोभायात्रा.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मो.9284056307
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर परिसरात प्रसिद्ध आलापल्ली येथील प्रभू श्रीरामचंद्राची शोभायात्रा मोठ्या उत्साहात निघाली.दोन वर्षानंतर प्रभू रामजन्माचा सोहळा व शोभायात्रा सार्वजनिकरित्या साजरा करण्यात येत असल्याने भाविकामध्ये मोठ्या प्रमाणात हर्षोल्हासाचे वातावरण होते.
आलापल्ली राम मंदिर आलापल्ली राम जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी वेगवेगळ्या झांकी साकारण्यात आले होते.यामध्ये घोडे, आकर्षक रथ राम लक्ष्मण सीता यांची झांकी आकर्षक रोषणाई व अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली .या झाकी मध्ये अनेक एक युवकांनी आणि महिलांनी भाग घेतले यात महिला लेझीम पथक हे आकर्षणाचे केंद्र होते फटाक्याच्या आतिशबाजी आणि राम भक्ताच्या गर्जना करत जयघोषाने अल्लापल्ली नगर संपूर्ण दुमदुमली
शोभायात्रा संध्याकाळी राम मंदिरापासून आलापल्ली नगरातून विर बाबुराव चौक बस स्टॅन्ड श्रीराम चौक सावरकर चौक मार्गे परत राम मंदिरात आले निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत ठिक ठिकानी करण्यात आले त्याप्रसंगी विर बाबुराव चौकात श्रीराम सेवा मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसाद वितरण करण्यात आले व फ्रेंड्स क्लब आलापल्ली तर्फे शरबत वाटप करण्यात आले श्रीराम चौक आलापल्ली च्या वतीने सुद्धा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सावरकर चौकात सुद्धा शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले शोभायात्रा पाहण्यासाठी आल्लापल्ली परिसरातील राम भक्त उपस्थित होते व माजी पालकमंत्रीराजे अंबरीश राव ,माजी आमदार दीपक आत्राम,माजी जीप अध्यक्ष अजय कांकडालवार यांनी शोभायात्रा मध्ये सहभाग घेतला व भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले . पोलिसांचा चोख बंदोबस्त होता श्रीराम जन्मोत्सव समिती व श्रीराम हनुमान मंदिर कमिटी व व्यापारी संघटना प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने ही शोभायात्रा संपन्न झाली.