ताज्या घडामोडी

चंद्रपूरसह राज्यातील इत्तर वीज उत्पादक जिल्ह्यांना भार नियमनातून मुक्त करा ! आ. किशोर जोरगेवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

राज्यभरातुन विजेचे मागणी वाढल्यामुळे राज्यात भार नियमन लागु होण्याची शक्यता आहे. मात्र या भार नियमनातुन चंद्रपूरसह राज्यातील ईतर विज उत्पादक जिल्ह्यांना वगळण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेत केली आहे. सदरहु मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे. तसचे वीज उत्पादक जिल्हांना २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी या विषयावरही आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.
सद्यस्थितीत राज्यात विजेच्या प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा मागणी जास्त असल्याने वीज टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. राज्यात विजेचे वाढती मागणी आणि पुरवठा यांचे साधर्म्य साधण्याकरिता नागरिकांवर वीज भार नियमन चे संकट उभारले आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका बर्यापैकी वाढला आहे. जगातील उष्ण शहरांमध्ये राज्यातील चंद्रपूर सह इतर शहरेसुद्धा समाविष्ट आहे. आणि हे शहरे प्रामुख्याने वीज उत्पादक आहे. औष्णीक विज प्रकल्पांमुळे दरवर्षी या शहरांमधील नागरिकांना तीव्र प्रदूषणासह उष्ण तापमानाचा तडाखा सहन करावा लागत असतो. अशात भारनियम लागु झाल्यास एक प्रकारे नरक यातनाच येथील नागरिकांना सहन कराव्या लागतील त्यातच शेतक-यांच्या उन्हाळी व भाजीपाला पिकांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा करणारे कृषी पंप विजे अभावी बंद राहिल परिणामी प्रदुषनासह आता विज कपातीचे दुहेरी संकट त्यांच्या पिकांवर येणार आहे.
चंद्रपूरसह इतर वीज उत्पादक जिल्ह्यातील नागरिक औष्णिक वीज प्रकल्पानमुळे तीव्र प्रदूषण आणि उच्च तापमान वाढीमुळे प्रचंड त्रास सहन करीत असल्याने सदरहु प्रकल्पांविरोधात त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे सदरहु विज उत्पादक जिल्ह्यात भार नियमन लागु करण्यात आल्यास विज प्रकल्पांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागण्याची शक्यताही नाकारता येत आहे. अशात विज प्रकल्पांविरोधात आंदोलने उभी राहण्याची शक्यता आहे. त्यामूळे या सर्व बाबींचा विचार करत वीज उत्पादक जिल्ह्यांना कायमस्वरूपी भार नियमनातून मुक्त करावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. सोबातच वीज उत्पादक जिल्हांना विशेष दर्जा देत सदर जिल्हांना घरगुती वापरातील २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा आमदार किशोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. याबाबत त्यांच्याशी चर्चाही यावेळी आमदार जोरगेवार यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close