ताज्या घडामोडी
पोलिस बाॅईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली चंद्रपूरचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर पोलिस बाॅईज असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यगणांनी काल मंगळवार दि.20 फेब्रुवारीला नव्याने आलेले पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. भेटी दरम्यान पोलिस बाँईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे
उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पदमाकर निमगडे ,महिला जिल्हाध्यक्ष स्मिता दाते’ ,उपाध्यक्ष कविता तिमा ,महिला संघटिका सविता खुटेमाटे राजश्री गेडाम , जिल्हा सचिव संजय खोब्रागडे , तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत डोंगरे आदिं पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.