इंधन दरवाढीविरोधात गोंडपिपरी येथे काँग्रेसचे निषेध आंदोलन

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे
कोरोनामध्ये अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतानाच केंद्र सरकारने दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढवत शंभरीपार नेल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसत आहे.सबका साथ सबका विकास असा नारा देऊन सत्तेत आल.परंतु भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेची,शेतकर्यांची निराशा केली आहे.दररोज इंधन दरवाढ करत पेट्रोल शंभरी तर डिझेल नव्वदी पार गेल्याने सर्वसामान्य जनता,शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्याच अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.ना.नानाभाऊ पटोले व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या चंद्रपूर दौरा उपस्थिती निमित्याने गोंडपिपरी येथील शिवाजी चौकातल्या पेट्रोल पंपवर इंधन दरवाढीविरोधात गोंडपिपरी काँग्रेस कमिटीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले व इंधन दरवाढ कमी करण्यात यावी म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.