राजोली,मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रात कार्यकारिणी गठित

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वृंदावन प्रभाग संघ राजोली मारोडा जिल्हा परिषद क्षेत्र मध्ये सर्वसाधारण सभा सौ. आरिफा बाबा भसारकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सदर सर्वसाधारण सभेत प्रभाग संघ संस्था नोंदणी 1860 अधिनियम कायद्याने संस्था नोंदणी करणे या विषयावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाला तालुका व्यवस्थापक श्री प्रकाश तुरानकर यांनी संस्थेचे फायदे समजावून सांगितले. प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर यांनी शासकीय परिपत्रक आचे वाचन केले.
सर्वसाधारण सभेमध्ये सात लोकांची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यामध्ये सौ. आरिफा बाबा भसारकर अध्यक्ष, श्रीमती. अलका उईके सचिव, सौ. लता खोबरागडे कोषाध्यक्ष, सौ. किरण सोनटक्के, सौ. मनीषा वाडगुरे, सौ. मनीषा बोमनवार, सौ. ममता आत्राम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सर्वसाधारण सभेला राजोली मारोडा क्षेत्रातील 16 ग्राम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक, स्नेहल मडावी तालुका समन्वयक, रुपेश आदे प्रभाग समन्वयक, विश्रांती संतोषवार ICRP, सौ. कल्पना येरणे ICRP, सौ.करुणा टिकले MCRP यांनी परिश्रम घेतले.