ताज्या घडामोडी

सुभाष दादा सोळंके यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ तर्फे मानद डॉक्टर पदवी प्राप्त

जिल्हा प्रतिनिधी:-अहमद अन्सारी परभणी

गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष डॉ.लाल बहादूर राणा यांचे मान्यतेने व डॉ. सुनील परदेशी, भारत प्रभारी, (GPFN) डॉ. श्रद्धा कोतवाल (दुसाने) महाराष्ट्र प्रमुख यांचे शिफारशीनुसार दिनांक १४,०१.२०२४ रोजी पोलीस मित्रपरिवार समन्वय समिती चे महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार सुभाष दादा सोळंके यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक येथे गांधी पीस फाउंडेशन नेपाळ तर्फे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
पदवीदान समारंभावेळी गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लाल बहादूर राणा, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी .जी. शेखर पाटील, मराठा विद्या प्रसारक सरचिटणीस व नाशिक जिल्हा बार कौन्सिल अध्यक्ष एडवोकेट श्री नितीन ठाकरे, माजी जिल्हाधिकारी डॉ. बी. एस. वाघ, अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संचालक डॉ. आनंद रत्नाकर अहिरे, , पोलीस मित्र परिवार समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष डॉ. संघपाल उमरे, तसेच सिद्ध रेखा फाउंडेशन भारत डॉ. प्राध्यापक श्वेता सचिन चौगुले, डॉ. सुनील परदेशी, डॉ. श्रद्धा कोतवाल (दुसाने) पंचमुखी हनुमान पिठाचे महंत श्री भक्ती चरणदास जी या सर्व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये सुभाष दादा सोळंके यांना सन्मानपूर्वक डॉक्टरेट पदवी व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सुभाष दादा सोळंके यांचे सोबत पत्नी सौ शोभा मुलगा श्री राहुल व मुलगी सौ स्मिता राहुल सोळंके हे सर्व सहपरिवारासोबत उपस्थित होते तसेच त्यांचे नमूद पदवी प्राप्त झाल्यामुळे सर्व सामाजिक स्तरावर अभिनंदन होत आहे
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुनील परदेशी व डॉ. श्रद्धा कोतवाल (दुसाने) डॉ. राजेंद्र आहेर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ मोहिनी भगरे यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close