ताज्या घडामोडी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या आगमना प्रीत्यर्थ ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
ग्रामपंचायत कोठारी अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या आगमना प्रीत्यर्थ ढोल ताशांच्या गजरात गावात रॅली काढून जंगी स्वागत केले..!!
जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाणून घेतली गावातील समस्या..!!
मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायत कोठारी अंतर्गत येत असलेल्या बोंदुकपली गावात जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट दिली असता बोंदुकपली गावातील नागरिकांनी जि.प. अध्यक्ष यांच्या प्रथम आगमना निमित्ताने ढोल ताश्यांनी जंगी स्वागत करत गांवात मिरवणूक काढली.त्यानंतर नागरिकांनी मुख्य चौकात बैठक घेवुन गावातील आरोग्य, शिक्षण, रस्ते,आदि बाबत समस्या मांडण्यात आले.चर्चा अंती जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सदर समस्याचे आपण निराकरण करू असे सांगितले.