चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस बस फेरी चे क्रांतिभूमी आष्टी मध्ये जल्लोषात स्वागत
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमूर-आष्टी क्रांतिभूमी आणि शहिदांच्या सन्मानार्थ भारतीय क्रांतीकारी संघटनेच्या प्रयत्नाने चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस 16 आगस्ट शहीद दिनापासून सुरु करण्यात आली सदर बसचे आष्टी क्रांतीभूमी मध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यां कडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. आष्टी क्रांती भूमीत बस पोहोचताच आष्टी बस स्टॉप वर क्रांती एक्सप्रेस बस ची वाट बघत असलेल्या गुरुदेव प्रेमींनी बस चे चालक, वाहक यांना गुरु देवाची भगवी टोपी, दुपट्टा, श्रीफळ देऊन तसेच पुष्पहाराने स्वागत केले, बस चे पूजन केले. त्याच प्रमाणे बस मध्ये आलेल्या भारतीय क्रांतीकारी संघटनेच्या 11 सभासदांचे पुष्पहाराने स्वागत केले. त्यापूर्वी सकाळी साडे सात वाजता स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात 16 आगस्ट क्रांतिदिनी राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगाराने चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस बस फेरी सुरू करून क्रांतिभूमी व शहिदांचा सन्मान केल्याबद्दल चिमूर आगाराचे सहाय्यक आगार प्रमुख इमरान शेख यांचे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी बोकारे यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करून बसचे पूजन केले. भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, जिल्हा अध्यक्ष तथा व्यापारी संघटनेचे सचिव सारंग दाभेकर, कैलास भोयर टेरेन्स कोब्रा, विकी मेश्राम, व्यापारी प्रतिनिधी प्रफुल कावरे, वार्ताहर विलास मोहिनकर, विनोद शिवरकर, कुंडलिक जांभुळे, विठ्ठलराव माथुलकर, सुभाष कटमुसरे, यांनी सदर बस ने आष्टी येथे जाऊन क्रांतिभूमी चे दर्शन घेतले व शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. चिमूर-आष्टी क्रांतिभूमी आणि शहिदांना देशपातळीवरर सन्मान मिळण्याचे दृष्टीने दोन्ही क्रांतिभूमी चा राज्य आणि केंद्र सरकारने सर्वांगीण जागतिक प्रसिद्धि युक्त विकास करावा, त्याचप्रमाणे गुरुकुंज आश्रम मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सर्वधर्म प्रार्थना मंदिर वास्तूचे तसेच त्यांच्या वापरण्यात आलेल्या वस्तू-साहित्याचे जतन करण्यात यावे या भारतीय क्रांतीकारी संघटनेच्या क्रांतिभूमी व शाहिदाप्रती असलेल्या भावनांच्या कृती कार्यक्रम उपक्रमाचे आष्टीकर गुरुदेव प्रेमींनी कौतुक करून स्वागत केले व उपरोक्त उपक्रमाला चिमूर आणि आष्टी येथील नागरिकांनी मिळून दोन्ही क्रांतिभूमी ला व शहिदांना देशपातळीवर सन्मान मिळवून देण्याकरिता एकत्रितपणे राबविण्याचे ठरविले. 79 वर्षा नंतर आष्टी मध्ये भारतीय क्रांतीकारी संघटने चे कार्याकर्ते आष्टी क्रांतिभूमी मधे येउन क्रांती भूमीचे दर्शन करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करणे हा इतिहास घडलेला आहे. असे मत विजेकर दादा यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय क्रांतीकारी संघटनेकडून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मोझरी येथील प्रार्थना मंदिर जतन करण्याबाबत चे तहसीलदार, आष्टी यांना लिहिण्यात आलेले निवेदन गुरुदेव प्रेमी कडे देण्यात आले. याप्रसंगी आष्टी क्रांती भूमीतील पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ठमके साहेब यांचेसह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सर्व श्री प्रकाश विजेकर, भारत दादा ठाकरे, राजेंद्रजी सावरकर, गुणवंतजी मानमोडे, श्रीरामजी डहाके, प्रवीण डहाके, आशिषजी मोहोड, दत्तुजी परतेती, रत्नाआप्पा हिरणवाडे उपस्थित होते.