ताज्या घडामोडी

वरोरा येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आठ राज्यात विस्तारलेला असून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन अमरावती येथे दिनांक 13 मार्च रविवार ला होत असून त्यानुसार नियोजन करण्यासाठी व नवीन तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेले हल्ले, चिरीमिरी तून पत्रकारांनी गमावलेली विश्वासार्हता, त्या संदर्भात संघटनेचे महत्त्व,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ घेत असलेली भूमिका यावर विशेषता चर्चा करण्यात आली. पोर्टल मीडियाच्या प्रतिनिधीच्या समस्या याबाबतही विस्तृत प्रमाणात चर्चा करण्यात आली आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना यासंदर्भात घेत असलेली भूमिका विशद करण्यात आली.
या बैठकीला प्रामुख्याने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र तिराणीक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पिंपळकर, अखिल भारतीय सामाजिक मंच चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. नीरज आत्राम, पर्यावरण प्रमुख दीपक कावटे, प्रा. वसंतराव माणुसमारे ( दैनिक सकाळ), प्रदीप कोहपरे (दैनिक भास्कर) खेमचंद नेरकर (दैनिक महा जागरण),ग्यानीवंत गेडाम (दैनिक सुवर्ण महाराष्ट्र), परमानंद तिराणिक, प्रशांत बदकी (पोर्टल लोकशाही हित), तुलसी अलाम (पोर्टल गोंडवाना न्यूज) इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close