रमजानच्या पवित्र महिणा निमित्त विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबत उप अभियंता पाथरी यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
रमजानच्या पवित्र महिणा निमित्त विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबत माननीय उप अभियंता म.रा.वि.वि.क.लि.पाथरी यांना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाण वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात विनंति करण्यात आली की, प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 02/03/ 2025 ते 01/04/2025 रोजी पर्यंत पवित्र रमजान महिना असणार आहे तरी या महिन्यात मुस्लिम समाज बांधव विविध धार्मिक भक्ती व प्रार्थना करत असतात यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे तरी निवेदनात विनंती करण्यात आली की, पाथरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये व पाथरी शहरांमध्ये ज्या ठिकाणी मेंटेनन्स ची आवश्यकता आहे ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे व या पवित्र महिन्यात पाथरी शहरांमध्ये व पाथरी तालुक्यातील सर्व गावांमधील विद्युत पुरवठा खंडित न करता सुरळीत ठेवण्यात यावा अशी निवेदनात मागणी करण्यात आली.
निवेदन देताना अहमद अन्सारी अजहर हदगाव कर कुरेशी र,ईसा अल्ताफ अन्सारी अय्युब पठाण शेख जफर ताबोळे फेरोज अन्सारी इत्यादींचे स्वाक्षरी आहेत.
हे निवेदन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व तहसीलदार शंकर हदशवार पोलिस निरीक्षक महेश लांडगे व साहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आले.