ताज्या घडामोडी

मानवत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव चा सर्वप्रथम क्रमांक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि. 8 डिसेंबर शुक्रवार रोजी मानवत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिजाऊ ज्ञानतीर्थ मानवतरोड शाळेत संपन्न झाले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथील “वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करणे” या प्रयोगाचा सर्वप्रथम क्रमांक आला.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 72 प्रयोगांची नोंद झाली होती. के के एम महाविद्यालयाचे सन्माननीय प्राध्यापक श्री रुपेश देशपांडे, श्री बालासाहेब होगे, श्री प्रल्हाद थोरात यांनी अत्यंत कुशलतेने विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे परीक्षण केले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यजमान जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवतरोड मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंद तसेच गटसाधन केंद्रातील सर्व विषय तज्ञ यांचे मोलाचे योगदान लाभले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथील प्रथम आलेल्या प्रयोगास शाळेतील विज्ञान शिक्षक श्री अमोल तापकीर सर यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रयोगाचे सादरीकरण कृष्णा दिगंबर पिंपळे या विद्यार्थ्याने केले. प्रयोग निर्मितीत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री दत्तराव पिंपळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री शिरीष लोहट सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व सन्माननीय सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close