रक्त दान जीवन दान आहे – ब्रह्मा कुमारी मीरा दीदी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कोरोना काळातील संपूर्ण देशभरामध्ये व राज्यातील रक्ताचा तुटवडा ही बाब लक्षात घेऊन ब्रह्माकुमारीज् सोनपेठ च्या वतीने येत्या 25 ऑक्टोबर 2021 वार सोमवार रोजी, सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत ब्रह्माकुमारीज् स्थानिक सेवा केंद्र सोनपेठ या ठिकाणी,
आदरणीय ब्रह्मकुमारी मीरा दीदी देविदास वाडकर (ब्रह्माकुमारीज् संचालिका सोनपेठ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था सोनपेठ तालुका महिला अध्यक्ष) यांच्या संकल्पनेतून, मातोश्री, के. सौ. कमल बाई देविदास वाडकर यांच्या पाचव्या पुण्य स्मृती दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून,या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून
मा .श्री.सारंग चव्हाण सर (तहसीलदार सोनपेठ)
प्रमुख पाहुणे म्हणून
मा. श्री .प्रदीप काकडे सर ( पोलीस निरीक्षक सोनपेठ) तसेच ,
प्रमुख उपस्थिती मधे
मा . श्री .प्रदीप गायकवाड सर (अध्यक्ष रोटरी सॅटॅलाइट क्लब सोनपेठ)
मा .श्री .नागनाथ सातभाई (अध्यक्ष आर्य वैश्य समाज सोनपेठ )
मा. श्री . घनशाम दास जी झंवर (व्यापारी )
व सर्व पत्रकार बांधव
उपस्थित राहणार आहेत .
अशी माहिती ब्रह्मकुमारी मीरा दीदी (ब्रह्माकुमारीज् संचालिका सोनपेठ) यांनी दिली .
पुढे बोलताना मीरा दीदी यांनी सांगितले की शेवटी मी सर्वांना एकच संदेश देऊ इच्छिते की आपण आपल्या आई-वडिलांना घरातील वडीलधारी व्यक्तींना जिवंत आहे तोपर्यंत आदर युक्त सन्मानाची वागणूक द्यावी त्यांच्या दैनंदिन गरजा पुरवाव्यात.व आई वडिलांच्या पश्चात त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी समाजोपयोगी कार्य करून गरीब गरजू ची वेळेवर मदत करून आशीर्वाद प्राप्त करावी.
तसेच रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी भाग घेऊन पुण्य कर्म करावे ही नम्र विनंती.