ताज्या घडामोडी

पाथरी येथे 204 वा भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 01/01/2022 शनिवारी रोजी पोलीस मित्र परिवार परीवार समन्वय समितीच्या वतीने आदरणीय डॉ. संघपाल उमरे संथापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पाथरी येथे जि.परभणी मराठवाडा विभागाच्या वतीने 204 वा भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला.
सकाळी ठिक दहा वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हार घालून अभिवादन करण्यात आले व भिमा कोरेगाव संघर्षातील शुरवीरांना मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सौ.संगीता नामदेव वाघमारे पाथरी पोलीस स्टेशनच्या दमंग दामिनी पथक महिला पोलीस प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला उदघाटकः महणुन मा.भारतीय बौद्ध महासभाचे पालक मंत्री मा. नारायण पैठणे हे होते आणि व प्रमुख पाहुणे म्हणून मा. परमेश्वर धनले, मुरलीधर ढवळे ,इंदुमती वाकडे व इतर सर्व कार्यक्रमाला मार्गदर्शक महणुन मा. शिवराज कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे मा.तालुका अधयक्ष यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मा. रेखाताई मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या सर्व पदधिकारी महिला यांनी परीश्रम घेतले सौ.सुमन साळवे सौ.मुक्ता डोंगरे सौ.सुशिलाबाई मनेरे सौ.मदा साळवे सौ. रेखा मनेरे सौ.मंदा साळवे व इतर सर्व महिला पदधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती अशा प्रकारे भिमा कोरेगाव 204 वा शौर्य दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली आणि समितीच्या वतीने पाथरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close