ताज्या घडामोडी

वढोली येथील 23 वर्षीय युवकाचा चंद्रपूरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

शुभमची हत्या की आत्महत्या ?
कारण गुलदस्त्यात..

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपीपरी

तालुक्यातील मौजा वढोली येथील 23 वर्षीय युवकाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत चंद्रपुरातील लालपेठ भागात एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढल्याने एकच खळबळ उडाली आहे.
युवकाचे नाव शुभम पुंडलिक चूधरी वय 23 रा.वढोली असे आहे. पडोली येथे मामाकडे राहून एका खाजगी कंपनीमध्ये शुभम काम करीत होता. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. या बाबत पडोली पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.
अश्यातच आज दि.23 जानेवारी रोज रविवारला चंद्रपूरातील लालपेठ भागातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वालकंपाऊंड लगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत शुभमचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शुभम ची हत्या की आत्महत्या हे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
शुभम च्या वडीलानी सुद्धा कर्जबाजारीपणामुळे आठ वर्षापूर्वी आत्महत्या केली होती.
त्यानंतर कुटुंबात शुभम, आई आणि त्याची बहीण मिळून कसे बसे कुटूंब चालवत होते. बहिणीचे लग्न झाले.कामानिमित्त शुभम शहराकडे कामाला आला.वडिलांचे दुःख कसे बसे विसरत जीवन जगत असताना आज रविवार ला शुभमचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने चूधरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वढोली गावावर शोककळा पसरली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close