शिक्षक कॉलनी पाथरी येथे विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांच्या कार्यालयाचे मा. नगरअध्यक्ष जुनेद भैया दुर्राणी यांच्या हस्ते उदघाटन!
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रचाराला शहरात प्रारंभ!
प्रभाग 3 बूथ क्रमांक 152 शिक्षक कॉलनी येथे पाथरी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार मा. आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी नगरअध्यक्ष जुनेद भैया दुर्राणी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ नागरिक, तरुण सहकारी व प्रभागातील मतदार बांधव उपस्थित होते!
जुनेद भैया दुर्राणी आपल्या मनोगतात म्हणाले, “२0 नोव्हेंबरला ‘ऑटो रिक्षा’ चिन्हासमोरील बटन दाबून बाबाजानी दुर्राणी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. हा विजय फक्त एका व्यक्तीचा नाही, तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.”
येथील नगरसेवक अलोक चौधरी यांनीही बाबाजानी यांच्या विकासकामांविषयी बोलताना सांगितले की, “साईजन्मभूमी विकास आराखडा मंजूर करणे, सांस्कृतिक सभागृह, व्यापारपेठ, आठवडी बाजार यांसारख्या भरीव कामांमुळे पाथरी शहराचा संपूर्ण विकास झाला आहे. त्यांनी प्रभागातील सर्वच भागात समर्पित कार्य केले आहे, त्यांना आमदार म्हणून पुन्हा संधी द्यावी.”
कार्यक्रमात घनश्याम भाऊ कासट व पिंटू सेठ बाहेती यांनीही बाबाजानी यांच्या कार्यावर आपली भूमिका मांडली!