ताज्या घडामोडी

२०० पेक्षा अधिक गावांना डांबरीकरणाच्या पक्क्या रस्त्याने जोडले – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन

प्रत्येक गाव वाडी वस्ती तांड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध – लोणीकर.

जयपुर-माळेगाव-केहाळ वडगाव ते दिंडी मार्ग आणि तळणी ते देवठाणा उस्वद या ७ कोटी ३६ लाख रुपयांच्या डांबरीकरण रस्त्यांचे लोणीकरांच्या हस्ते उद्घाटन.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परतुर विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित होता परंतु मागील पंचवार्षिक मध्ये मतदारसंघातील सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मंत्रिपद मिळालं आणि त्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघातील २०० पेक्षा अधिक गावांना डांबरीकरणाच्या रस्त्याने जोडण्याचे भाग्य मला लाभले अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाले तरीदेखील अनेक गावांना आहे तो रस्ता मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण पूर्ण केला त्यामुळे कुठलेही राजकारण केले नाही असेही यावेळी लोणीकर यांनी सांगितले.
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव व तळणी येथे आयोजित डांबरीकरण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी शिवाजीराव खंदारे, गणेशराव खवणे, सतीशराव निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेश घारे, नाथराव काकडे, दत्तात्रय कांगणे, नगरसेवक सचिन बोराडे, नारायण काकडे, गणेशराव कापकर,गजानन देशमुख दारासिंग चव्हाण नवनाथ खंदारे सुभाष राठोड अविनाश राठोड, सुरेश राठोड, महादेव बाहेकर, पवन केंधळे, मनोज देशमुख, नितीन चाटे, विवेक काकडे, शरद पाटील नितीन सरकटे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, उपअभियंता निवारे, गटविकास अधिकारी थोरात शाखा अभियंता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती
जयपुर माळेगाव ते दिंडी मार्ग हा ०४ कोटी ११ लक्ष रुपयाचा निधी मंजूर असलेल्या डांबरीकरणाच्या ०६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन आज माजीमंत्री आमदार बबनराव जास्त करण्यात आले मंठा तालुक्यातील महत्वपूर्ण रस्त्यांपैकी हा रस्ता असून या रस्त्यावर जयपूर एरंडेश्वर कोकरसा शिवनगिरी बेलोरा सरकटे वझर यासारख्या अनेक गावांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण होता त्या रस्त्याचे दर्जेदार असे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला
तळणी ते देवठाणा उस्वद या गावासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या व मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यासह विदर्भाला जोडल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यापैकी महत्त्वाचा रस्ता असून तळणीसारख्या बाजारपेठेच्या गावाला जोडल्या जाणाऱ्या या रस्त्यामुळे परिसरातील गावांसह परिसराचा विकास होण्यासाठी मदत होईल. तळणी ते देवठाणा उस्वद या रस्त्यासाठी सुमारे ०३ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून ४ किमी लांबीचा दर्जेदार असा रस्ता लवकरच तयार होईल असा विश्वास यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केला
यावेळी रावसाहेब वैद्य, अनंता वैद्य, शेषनारायण दवणे, दीपक दवणे, गोविंदराव देशमुख अशोक राठोड सुधाकर सरकटे किशोर हनवते गणेश दवणे, भीमराव खरात, जितेंद्र सरकटे, सुनील नागरे, अनिल खंदारे नारायण राठोड, सुंदर दवणे, विष्णू दवणे, जनार्धन दवणे, अरुण खवणे माऊली राठोड संदीप पाटील रामभाऊ सरकटे रामकिसन सरकटे गजानन शिंदे रवी पाटील गुलाब राठोड रामेश्वर देशमुख शिवाजीराव थोरवे आबासाहेब सरकटे, केशव येऊल, सुभाष लाड हरिभाऊ मोतेकर भगवान मुदळकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close