प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर, पाथरी येथे विजयादशमी उत्सवाचा प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
covid-19 च्या संसर्गजन्य आजाराच्या प्रशासकीय नियमांच्या अधीन राहून आज प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे विजयादशमी उत्सवास प्रारंभ झाला. प्रथम दिनी पहाटे साडेपाच वाजता श्रीसाईबाबांची काकड आरती नंतर श्रींचे मंगल स्नान झाले नंतर श्रीसाई मंदिरातून श्रीसाई चरित्र ग्रंथाची टाळमृदंगाच्या गजरात मिरवणूक निघाली, या मिरवणुकीत श्री संजय भुसारी, विश्वस्त यांनी श्रींची पोथी घेतली, आर्किटेक्ट श्री सुभाष दळी, विश्वस्त यांनी प.पू.श्रीसाईबाबांची प्रतिमा घेतली, श्री सूर्यभान सांगडे, विश्वस्त यांनी विणा घेतली. त्यानंतर श्री संजय भुसारी, विश्वस्त यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथ पारायणाला सुरुवात झाली. या पारायणामधे पहिल्या अध्यायाचे श्री सिताराम धानु, अध्यक्ष यांनी पारायण केले तसेच दुसरा अध्याय श्री सूर्यभान सांगडे, कोषाध्यक्ष विश्वस्त, तिसरा आर्किटेक्ट श्री सुभाष दळी विश्वस्त, चौथा अध्याय श्री नारायण के कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पाचव्या अध्यायाचे सौ नीलिमा भुसारी यांनी पारायण केले.
उत्सवाचे प्रथम दिनी श्री सूर्यभान सांगडे, कोषाध्यक्ष विश्वस्त यांचे शुभहस्ते प.पू.श्रीसाईबाबांना महाभिषेक करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता श्रींची महाआरती होईल, दुपारी साडेतीन वाजता कीर्तन होईल, सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी राम रक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र व नंतर धुपारती होईल, सायंकाळी सात वाजता श्रींची पालखी निघेल.
कोरोना रोगाचे निर्मूलन व्हावे म्हणून प.पू. श्रीसाईबाबांचे चरणी प्रार्थना करण्यात आली.