जूना मानवत रस्त्याचा प्रश्न कायमचा निकाली; गणपती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रभाग क्र. २, ३ व ५ या तिन्ही भागांना जोडणारा महत्वाचा आणि मोठी रहदारी असणारा गणपती रस्ता कामाच्या प्रतीक्षेत असल्याने अनेक दिवसांपासून या बाबत असणारी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. आज या रस्त्याचे काम सुरू झाले. या कामाचे उद्घाटन केल्याचे विशेष समाधान आहे.
या रस्त्यामुळे बौद्ध नगर, परकोट मोहल्ला, संभाजीनगर, कोट गल्ली, पेठ मोहल्ला, लाड गल्ली, जुने दत्त मंदिर परिसर व आंबेगाव नाका भागातील नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने या रस्त्याचे विशेष महत्त्व आहे. मागील अनेक वर्षांपासून चार चाकी गाडी या रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागायची. या रोडमुळे हा मुख्य प्रश्न सुटला आहे.
कार्यक्रमास सुरेशशेठ काबरा, संजयजी लड्डा, ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब मोरे, रेनकोजी दहे, गणेश कुमावत, दत्ताजी चौधरी, विनोदभैया रहाटे, नागनाथ कुऱ्हाडे, प्रवीण मगर, बळीभाऊ चव्हाण, अनिरुद्ध पांडे, बळीराम रासवे, सत्यशील धबडगे, नंदू कच्छवे, बिजू पाटील, रतन दहे, बालाजी दहे, श्रीरंग सोरेकर, बंडू दहे, प्रभाकर दहे, रवी वाघमारे यांच्यासह तिन्ही प्रभागातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
प्रतिनिधी:-अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.