ताज्या घडामोडी
आनंद निकेतन कृषी महाविद्यालय येथिल कृषी दुता मार्फत चिकणी येथे कीड व्यवस्थापन मार्गदर्शन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
ग्रामीण कृषी कार्यानुभव अतंर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यानां कीड व्यवस्थापन या बदल मार्गदर्शन केले.यामध्ये शेतकऱ्यांना मित्र कीटक व शत्रू कीटक याबदल संपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच किड्या द्वारे होणारे नुकसान कसे टाळावे व त्याच बरोबर मित्र किड्यांची ओळख व त्या पासून होणारे फायदे या बद्दल माहिती देण्यात आली. विदयार्थी सोपान भगत, क्षितिज देवळे, दीपक भोंगळे,आश्रय ढवळे,सुयोग बुरीले उपस्थित होते.या करिता विद्यार्थांना महाविद्यालया प्राचार्य डॉ एस.एस पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ आर.व्हि. महाजन, कार्यक्रम समन्वय डॉ एस.एन.पंचभाई , विषयतज्ञ डॉ एन.डी.गजबे यांचे मार्गदर्शन लाभले.