डॉ बाबासाहेब आंबेडकराचा शाळा प्रवेशदिन जगातिल विद्यार्थीसाठी शैक्षणिकयुगाचा आरंभ -समतादुत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
जगात सर्वात आदर्श असलेले असे भारताच्या सविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दीन 7 नोव्हेंबर 1900 साली सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमंधे झाला डॉ आंबेडकर यांचे शाळेतिल पहीले पावूल हे भारत देशातिल करोडो वंचिताच्या बहूजनाचे मुक्तीमार्गाचे सोनेरी पर्व ठरुन जगातिल सर्व विद्यार्थीसाठी आदर्श प्रेरणादायी शैक्षणिक विचाराच्या सिम्बॉल ऑफ नॉलेजच्या युगाचा आरंभ झाला असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी लुम्बिनी बुधाविहार चिमुर येथील शाळा प्रवेश दिनानिम्मीत दीपस्तंभ वाचनालयाच्या उद्घाटनीय मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा राउत होत्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे पुढे बोलताना म्हणाल्या
ज्ञान वाचन व्यासंग लेखन चिंतन वक्तृत्व असे चौफेर व्यक्तीम्त्व असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असलेले शिक्षण विद्यार्थीविषयक मत होते असे होते की राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवते ते खरे शिक्षण होय विद्यार्थीनी जागृत रहा काय शिकाव विद्यार्थीनी पाहिले पाहीजे स्वतची पात्रता विद्यार्थीदशेतच वाढवावी नुसते शिक्षण घेवू नका स्वतला सिध करा विद्यार्थी भारतासाठी जगनारा विज्ञानवादि असला पाहीजे
शिका संघटीत व्हा संगर्ष करा हिच व्यवस्था परिवर्तनाची रणनिती आहे उच्य शिक्षण घेवून संघटीत होवून समाजातिल मानसिक समजिक आर्थिक गुलामीच्या विरोधात संघर्ष करन्याची प्रेरणा द्यावी उच्यशिक्षण सर्व समाजिक दुखन्यावर ऐक्मेव उपचार आहे शिक्षनासारखा दुसरा गुरु नाही शिक्षण वाघीनीचे दुध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशीवाय राहनार नाही तेव्हा बुधिमतेत व कार्यक्षमतेत कमी पडनार नाही याची दक्षता विद्यार्थीनी घेतली पाहीजे विद्यार्थीनी आपले कर्त्वय जबाबदारी कशी पार पाडतात यावर समाजाचे भवितव्य अवलंबून असते शिल व नैतिकतेशिवाय शिक्षनाचे मुल्य शुन्य आहे ज्ञान मानवी जिवनाचा आधार आहे विद्यार्थीनी बौधिक क्षमता वाढवने गरजचे आहे राजकीय आंदोलनाला जेवढे आपन मह्तव देतो तेवढेच शैक्षणिक चळवळीला दिले पाहीजे असे दीपस्तंभाप्रमाने बाबसाहेब यांचे विचार होते म्हणून भारतीय सविधानात मुलभुत हक्कातिल समता विषयक कलम 15 नुसार सामाजिक शैक्षणिक नोकरी राजकीय क्षेत्रातिल समाजघटकाला आरक्षण डॉ आंबेडकर यांनी दिले शिक्षण समाजाचा आत्मा आहे यासाठी डॉ आंबेडकर यांनी स्वत वाचनालय अभ्यासवर्ग वस्तीगृह रात्रीचीशाळेची व्यवस्था विद्यार्थिना करुन दिली तेव्हा संपुर्ण बुधाविहारात वाचनालयाची निर्मिती करावी अश्या ज्ञानसुर्य महामानवाचे विचार सर्व विद्यार्थीना प्रेरणादायी आहे शाळाप्रवेश दीन 2017 पासून राज्यभर साजरा करतात पन बाबसाहेब यांचा शाळाप्रवेश दीन संपुर्ण भारतभर साजरा करावा असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यानी केले कार्यक्रमाचे संचालन मनिषा शंभरकर तर आभार अर्चना तागडे यांनी केले.