उंचखडक बुद्रुक येथील श्री क्षेत्र राममाळ येथे सभापती मारुती मेंगाळसाहेब यांच्या विकास निधीतून विकास कामे..!!
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रूक येथील तालुक्यातील एकमेव असे प्रभु श्रीराम भक्तांची अत्यंत श्रध्दा असलेले श्री क्षेत्र राममाळ येथे स्वच्छता गृहाची फार मोठी अडचण होती वर्षभर याठिकाणी मंदिर परिसरात विविध सामाजिक / धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात या कार्यक्रमांनिमित्त अनेक भाविक भक्त या ठिकाणी मुक्कामी असतात त्यांच्या सोयी सुविधांसाठी मंदिर परिसरात स्वच्छतागृह इमारतीचे काम होणे ही काळाची गरज होती आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सभापती श्री.मारुती मेंगाळसाहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून येथिल स्वच्छता गृहाचा प्रश्न मार्गी लागला यानिमित्ताने श्री सद्गुरु यशवंतबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मेंगाळसाहेबांचा सन्मान करण्यात आल्या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक श्री.अशोकराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मेंगाळसाहेबांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.याप्रसंगी अकोले तालुक्याचे भुषण ह.भ.प.दिपक महाराज देशमुख,देवस्थानचे महंत भागवताचार्य ह.भ.प.विठ्ठलपंत गोंडेमहाराज तसेच ट्रस्टचे विश्वस्त श्री.प्रतापराव देशमुख,श्री.भाऊसाहेब खरात,श्री.हिंमतराव मोहीते, श्री.देवराम शिंदे,श्री.भरत देशमुख आदी उपस्थित होते.सद्गुरु यशवंतबाबा व प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत सालाबादप्रमाणे श्रीराम नवमीच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमीत्ताने अकोले तालुक्याचे भुषण ह.भ.प.दिपक महाराज देशमुख (सुगावकर) व सभापती मरुती मेंगाळसाहेब यांच्या शुभहस्ते धर्मध्वजारोहन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे कार्यक्षम उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टिस्टेटचे संचालक श्री.महिपाल देशमुख(बबनराव) यांनी केले.